Coronavirus : स्वतः ‘कॅन्सर’शी लढणारा ‘जिगरबाज’ इरफान खान मजूरांसाठी करणार ‘हे’ काम
पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात वेगाने कोरोना फोफावत असून या विरूद्धच्या लढाईत मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी सरसावले आहेत. कोरोनामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला असून यामुळे अनेक गरजू लोकांचे हाल होत आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम ज्यांचे पोट हातावर आहे, अशा लोकांवर झाला आहे. अशातच अनेक मजूरांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली आहे. या मजूरांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी धावून आले आहेत. आता या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता इरफान खानचेही सहभाग घेतला आहे.
मजूरांना मदत करणार असल्याची माहिती इरफान खानने ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये ’मजूरांसाठी काही खास करण्याची इच्छा आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे की, प्रवासी मजूरांसोबत जे झाले त्यांचा पश्चाताप करण्यासाठी तो शुक्रवारी 10 एप्रिलला उपवास ठेवणार आहे. हा उपवास सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
’स्वतः कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत असताना इरफान खानने या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत मजूरांना आर्थिक मदत दिली आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांनी मदत करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांनीही आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमानने 25 हजार मजूरांच्या बँक खात्यात पैसे पाठविले आहे.