Birthday SPL : कंगना रणौतनं ‘असा’ साजरा केला 33 वा वाढदिवस, शहिंदांसाठी गायली कविता ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौत आज आपला 33 वाढदिवस साजरा करत आहे. आज तिनं मनालीतील आपल्या घरीच कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. पूजा केली तिनं लहान मुलींचं पूजनही केलं. आज शहिद दिवस आहे. तिनं या स्पेशल दिवशी शहिदांचंही स्मरण केलं. कंगनानं कैफी आझमी यांनी लिहिलेल्या कर चले हम फिदा या कवितेतील काही ओळी गायल्या.

कंगनाच्या तिच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे. व्हिडीओत कंगना म्हणते, “आज सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे. त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आज एक महत्त्वाचा दिवस आहे. आज आपले स्वातंत्र्य सेनानी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू शहिद झाले होते. त्यांच्यासाठी मी कैफी आझमी यांनी लिहिलेल्या कवितेतील काही ओळी गाऊ इच्छिते.” असं म्हणून कंगना कवितेतील काही ओळी गाते.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. यात ती तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. याचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे.