‘दबंग-३’ : सलमानची हिरोईन सई मांजरेकरचे ‘ते’ फोटो ‘लीक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दबंग-३ चित्रपटाची अभिनेत्री महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सई मांजरेकर लवकरच दबंग-३ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता सलमान खान सोबत दिसून येणार आहे. सोशल मीडियावर सईचे दबंग-३ च्या सेटवरील फोटो लीक होऊ नये म्हणून, सेटवर मोबाईल फोन वापरण्यास बंदी होती.

परंतु, सई मांजरेकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन-तीन फोटो शेयर केले आहेत आणि ते फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

चित्रपट दबंग-३ सई मांजरेकर सलमान खानच्या तारुण्यातील गर्लफ्रेंड म्हणून दिसणार आहे. नुकतीच सईने आपल्या सीनची शुटिंग पूर्ण केली आहे आणि आता ती एका गाण्यासाठी तयार झाली आहे.

असे म्हंटले जात आहे की, सईला घेण्याआधी सलमान खान संकोच करत होता, कारण त्याने पाहिले तेव्हा ती खूप लहान होती. परंतु काही वर्षानंतर त्याने पुन्हा सईला बघितले आणि त्याने निर्णय घेतला की, चित्रपटासाठी ती योग्य आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like