अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर कंगना रनौत म्हणाली – ‘जो स्त्रियांचा अपमान करेल, त्यांचे पतन निश्चित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   JNN। मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या खुलास्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले गेले होते, त्यानंतर सोमवारी त्यांनी त्यांचा राजीनामा मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत यांनी ट्विटवर आपली प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ही तर फक्त सुरवात आहे, ”आगे-आगे देखिए क्या होता है।”

किंबहुना एका युजर्सने कंगना रनौत यांच्या त्या व्हिडिओचा एक हिस्सा ट्विट केला आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या कार्यालयात फोडफोड केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबोधित करत असे म्हंटले होते की ”वेळ बदलेल”. आज माझे घर तुटले आहे. उद्या तुमचा अहंकार तुटेल.

कंगनाने हा व्हिडीओ ट्विट करून लिहिले- ”जे साधूंची हत्या आणि स्त्रियांचा अपमान करतात, त्यांचे पतन निश्चित आहे.” ही फक्त सुरवात आहे- ”आगे-आगे देखिए क्या होता है।” कंगनाने अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे हॅशटॅगचा वापर केला आहे. गेल्यावर्षी BMC ने कंगनाच्या पाली हिल स्थित रहिवासी कार्यालयाची अवैध बांधकाम करण्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली होती. कंगनाने या कारवाईच्या विरोधात मुंबई हाय कोर्टाचा आश्रय घेतला. हायकोर्टाने कंगनाच्या बाजूने हा निर्णय जाहीर करताना तोडफोडीला सूड उडविणारी कारवाई म्ह्णून संबोधले.

कंगनाच्या कार्यालयात तोडफोडीच्या प्रकरणाची जोरदार लढाई झाली होती आणि राजकीय गुंडांमध्येही याचा प्रतिध्वनी ऐकू आला. कंगनाच्या चित्रपटबद्दल बोलले तर तिचा ”थलावी” हा चित्रपट २३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. हा एक राजकीय-थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात कंगना तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ए.एल.विजय यांनी केले आहे. याशिवाय कंगनाच्या आगामी चित्रपटात तेजस आणि धाकड यांचा समावेश आहे. कंगनाने अलीकडेच तेजसचा राजस्थानचा दौरा पूर्ण केला आहे.