‘शॉर्ट स्कर्ट’ घातल्यानं शाहिद कपूरची बायको मीरा ‘गोत्यात’, लोक म्हणाले ‘मिशा’चे कपडे का घातले ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बर्‍याचदा चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्समुळे कधीकधी चर्चेत राहिलेली मीरा सध्या तिच्या मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली आहे. नुकताच मीरा राजपूतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मीरा पांढरा शर्ट आणि यलो मिनी स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. तिच्यासमवेत मुलगी मीशा देखील होती. मात्र तिच्या या लूकमुळे काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

काही लोकांना आई आणि मुलीची ही जोडी खूपच क्यूट वाटली आहे. तर काहींनी तिला ट्रोल केले. काही लोक होते ज्यांना मीराचा मिनी स्कर्ट आवडला नाही. एका युजरने कमेंट केली की , आंटीने मीशाचे कपडे घातले. शाहिद इतका पैसा कमावत आहे, कपड्यांवरही थोडा खर्च कर. मी लहान कपड्यांच्या विरोधात नाही. पण लहान मुलांचे कपडे … असही एका युजरने म्हंटले आहे.

दुसऱ्या युजरने म्हंटले की , ‘कोणीतरी मीराला स्वतःचे कपडे खरेदी करण्यास सांगा. मीशाचे कपडे घालू नको. हिच्या मुलीने हिच्यापेक्षा मोठे कपडे घातले आहेत. एकाने तर असं म्हंटल की , पैसा क्लास नाही खरेदी करू शकत. मीशाच्या स्कर्ट मम्मीने चुकून घातला का ? एवढा अ‍ॅटीट्युड घेऊन आपल्या घरी जा. मीरा तिच्या या लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती. तिने पैपराजींना स्माइल करत पोजही दिली. मात्र तिला त्यावेळेस काय माहित एवढा स्टाइलिश लूक लोकांना चांगला वाटणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like