नेपाळचे PM के पी शर्मा ओली यांनी ‘अमिताभ-अभिषेक’ ‘कोरोनो’तून लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना !

नेपाळ आणि भारत अशा दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. असं असताना आता नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

के पी शर्मा ओली यांनी ट्विट करत लिहिलं की, “भारताचे दिग्गज स्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना चांगलं आरोग्य लाभावं आणि ते लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.”

के पी शर्मा ओली यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळ्यानंतर आता मुंबईच्या नानावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोरोनाची जास्त लक्षण आढलेली नाहीत.

‘अमिताभ-अभिषेक’ची प्रकृती स्थिर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ आणि अभिषेक दोघंही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. बच्चन कुटुंबातील 4 जणांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या स्टाफ मेंबर्सचीही कोरोना टेस्ट झाली आहे. बच्चन कुटुंबात असणारा सर्व स्टाफ कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. एकूण 54 लोकं बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आले होते. रविवारी एकूण 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. याशिवाय 26 लोकं हाय रिस्कवर होती. याच 26 लोकांची कोरना टेस्ट करण्यात आली होती. या सर्व 26 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या 14 लोकांनाही पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like