आता PM मोदी आणि HM शाहांच्या ‘अतिशय’ जवळच्या ‘या’ व्यक्‍तीवर बनणार चित्रपट, ‘खिलाडी’ अक्षय कुमार मुख्य भूमिकेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात देशभक्तीवर आधारित असलेले सिनेमे पाहायला मिळत आहेत. निर्माते आणि दिग्दर्शक ते मोठ्या प्रमाणात तयार देखील करत आहेत. या सगळ्यात अभिनेता अक्षय कुमार हा आघाडीवर असून त्याने आतापर्यंत सर्वात जास्त देशभक्तीवर आधारित असलेल्या सिनेमांमध्ये काम केले असून त्याने आतापर्यंत बेबी, नाम शबाना, एयरलिफ्ट यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यानंतर आता त्याच्याकडे एक नवीन भूमिका चालून आली असल्याची माहिती मिळत आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवनावर तयार करण्यात येणाऱ्या या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत असून अजित डोवाल यांची भूमिका तो साकारत आहे. अनेक देशभक्ती सिनेमे दिग्दर्शित करणारा नीरज पांडे हा सिनेमा तयार करणार असून त्याने याआधी देखील अक्षय कुमारने काम केलेले अनेक सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. स्पेशल छब्बीस, बेबी, नाम शबाना यांसारख्या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले असून या नवीन चित्रपटाचे देखील तोच दिग्दर्शन करणार आहे. या आठवड्यात अक्षय कुमारचा मिशन मंगलयान हा सिनेमा येत असून त्याच्याकडे अनेक सिनेमे असून तो वर्षाला चार ते पाच सिनेमे घेऊन प्रेक्षकांना भेटायला येत असतो. त्यानंतर आता तो प्रेक्षकांना हा नवीन सिनेमा घेऊन भेटायला येणार आहे.

दरम्यान, सध्या या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु असून या चित्रपटाबाबत अधिक माहिती समोर आली नसून लवकरच या सिनेमावर काम सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नीरज पांडे याने याआधी महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर देखील महेंद्रसिंग धोनी : द अनटोल्ड स्टोरी नावाचा सिनेमा बनवला होता. त्यामुळे आता तो हा सिनेमा कसा बनवतो याकडे सर्व चित्रपट रसिकांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –