‘कोरोना’ व्हायरस रजनीकांतच्या संपर्कात आला तर काय होईल ? अभिनेता रोहित रॉयनं दिलं उत्तर ! चाहत्यांनी केलं ‘ट्रोल’

कोरोना व्हायरस जर साऊत सुपरस्टार रजनीकांत यांच्या संपर्कात आला तर काय होईल हा विचार कदाचित तुम्ही केला नसेल. परंतु अभिनेता रोहित रॉयनं इमॅजिनही केलं आणि ते पोस्टही केलं. यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. परंतु त्यानं लोकांन चिलपिल घ्यायला सांगितलं.

रोहितनं त्याच्या इंस्टावरून एक इमेज शेअर केली आहे. यात लिहिलं आहे की, रजनीकांत कोरोना पॉझिटीव्ह आढळले. आता कोरोना क्वारंटाईनमध्ये आहे. यासोबत रोहितनं लोकांना मोटीवेट करत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षित राहण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजर वापरण्याचा सल्लाही त्यानं दिला आहे.

तसं तर रजनीकांतवरून आजवर असे अनेक जोक्स करण्यात आले आहेत. परंतु रोहित रॉयची पोस्ट मात्र चाहत्यांना आवडली नाही. यामुळं अनेकांनी त्याला ट्रोल केलं. रोहितनं याला उत्तरही दिलं.

रोहितनं लिहलं की, “मित्रांना शांत व्हा. एवढे कठोर बनू नका. हा एख विनोद आहे. आण माफ करा कराण मला नाही वाटत की हा जोक वाईट हेतूनं केला आहे. हा बिल्कुल रजनी सरवाला जोक आहे. माझा हेतू तुम्हाला हसवण्याचा हता. तुम्हाला हर्ट करण्याचा उद्देश नव्हता.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like