SSR Death Case : रिया चक्रवर्तीनं सांगितली एक-एक ‘गुपितं’, युरोप ट्रीपनंतर कसं बदललं सुशांतची ‘जीवन’

मुंबई : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक प्रकारचे आरोप होत आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रिया आणि तिच्या कुटुंबासह ६ जणांवर गंभीर आरोप केले आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. या सर्व आरोपानंतर लोकांचे लक्ष रियाकडे आहे. याच दरम्यान रियाने पहिल्यांदाच सुशांतबद्दल एक विधान केले आहे, ज्यात तिने आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देत सुशांतच्या आयुष्याबद्दल सांगितले आहे.

सुशांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती या प्रकरणात प्रथमच खासगी वाहिनीशी बोलली. या दरम्यान तिने सुशांत कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायचा हे सांगितले.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर जो पैशांचा आरोप केला आहे, ते आरोप फेटाळून लावत ती म्हणाली कि सुशांत नेहमीच किंग साईज लाईफ जगत होता. माझ्याशी नात्यात येण्यापूर्वी तो थायलंड ट्रिपला गेला होता, तिथे त्याने ६ मुलांवर ७० लाख रुपये खर्च केले होते.

युरोप ट्रिपचा संदर्भ देत ती म्हणाली की, जेव्हा आम्ही युरोप ट्रिपला जात होतो तेव्हा सुशांतने सांगितले होते की त्याला विमानात बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेतो. त्याचे नाव मेडाफिनिल आहे. त्याने ते औषध उड्डाण करण्यापूर्वी घेतले, कारण औषध नेहमी सुशांतकडे असायचे.

या मुलाखतीत रियाने तिच्या भावाला युरोपला का नेले? युरोप टूरमध्ये काय झाले? हे प्रश्न विचारले गेले, ज्याचे उत्तर तिने दिले. तिने सांगितले की, आम्ही पॅरिसमध्ये गेलो, सुशांत तीन दिवस खोलीतून बाहेर आला नाही. ती म्हणाली, मला ते पाहून थोडे अस्वस्थ वाटले, कारण मी खूप उत्साही होते. मला वाटले कि त्याची फनसाईड बघू शकेल, कारण तेथे तो आरामात रस्त्यावर फिरू शकतो, जे तो भारतात करू शकत नव्हता.

पण स्वित्झर्लंडला पोचल्यावर तो खूष झाला होता. त्यानंतर इटलीला आलो, तेव्हा आमच्या खोलीत एक विचित्र रचना होती. रियाने सांगितले की, मला खोलीत भीती वाटत होती, पण सुशांत म्हणाला सर्व काही ठीक आहे. रिया म्हणाली की, त्यावेळी सुशांतने तिला सांगितले होते की इथे काहीतरी आहे, पण मी म्हणाले की एक वाईट स्वप्न असू शकते. त्यानंतरच सुशांतची प्रकृती बदलली आणि त्याला खोली सोडायची इच्छा नव्हती.

रियाने सांगितले की, २०१३ मध्ये तिच्यासोबत असे घडले होते. जेव्हा तिच्यासह नैराश्यासारख्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. तेव्हा ती मानसशास्त्रज्ञांना भेटली होती, ज्यांचे नाव हरेश शेट्टी आहे, त्यांनीच औषधाबद्दल सांगितले होते.

या दरम्यान ती शोविक-सुशांतमधील बॉन्डिंगबाबत रियेलीटीक्स नावाच्या कंपनीबद्दलही बोलली. रियाने सांगितले की, हा सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्यात मी, माझा भाऊ आणि सुशांत तिघे पार्टनर होतो. यासाठी तिघांना ३३-३३% द्यायचे होते, मी माझ्या खात्यातून माझ्या भावाचे पैसे दिले होते. रिया बोथटपणे म्हणाली की, आज माझ्यावर आरोप केले जात आहेत, पण आम्ही दोघ कपल म्हणून राहत होतो.