आलिया भटमुळं चालू ‘इव्हेंट’मध्येच रडू लागली सारा अली खान (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सारा अली खान आपल्या एका लेटेस्ट व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. सारा अली खान चक्क या व्हिडीओत रडताना दिसत आहे. सध्या साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. परंतु सारा खरंच रडत आहे का असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. चला जाणून घेऊयात की, सारा का रडत आहे.

सारा अली खान नुकतीच एका इव्हेंटमध्ये आली होती. यावेळी सारानं खूप मस्ती केली. या इव्हेंटमध्ये साराला गली बॉय सिनेमातील आलिया भटचा डायलॉग 3 वेगळ्या व्हेरिएशन्स मध्ये बोलायला लावला होता. यावेळी सारानं दोन वेळा हा डॉयलॉग रागात आणि दमदार अंदाजात घेतला. परंतु तिसऱ्या व्हेरिएशनवेळी मात्र तिनं हा डॉयलॉग रडत रडत घेतला. सध्या साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की डायलॉग बोलल्यानंतर सारा लगेचच तिथून निघून जाते. साराच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

Fam-Jam 🌈🧿 Sun-Tan ☀️ 🌊

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे. अलीकडचे सिनेमातील एक गाणं शुट केलं आहे.

You might also like