मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 स्टार हॉटेलमूधन पकडल्या 2 TV अ‍ॅक्ट्रेस आणि बॉलीवुडची बेली डान्सर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे उपनगर गोरेगावच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी एका बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेससह तीन मुलींना येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींच्याविरूद्ध भारतीय दंड विधानचे कलम देह व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, क्राइम ब्रँचच्या टीमने शुक्रवारी सायंकाळी उशीरा एका पंचतारांकित हॉटेलवर छापा मारला. ग्राहक म्हणून पोलिसांच्या पथकातील सदस्यांना हॉटेलमध्ये पाठवले गेले, येथे ते सेक्स रॅकेट डिलर्सला भेटले. यानंतर पोलिसांनी छापेमारी करून घटनास्थळावरून 3 महिलांना सोडवले. पोलिसांनी ज्या तीन महिलांना अटक केली आहे, त्यांच्यापैकी एक बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस आहे. तिच्यावर मोठ-मोठ्या हॉटलेमध्ये देह व्यापारासाठी बॉलीवुड आणि टीव्ही जगतातील अ‍ॅक्ट्रेसेला आणण्याचा आरोप आहे.

बॉलीवुडची एक इंटरनॅशनल बेली डान्सर आणि दोन टीव्ही सीरियल कलाकारांची देह व्यापारासाठी 10 लाख रुपयांत डिल फिक्स झाली होती. पोलिसांनी ताबडतोब रॅकेटचा पर्दाफाश करत प्रकरणावर कारवाई सुरू केली आहे.