Coronavirus : ‘सिंगर’ कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण ! कुमार विश्वास यांनी दिली ‘संतप्त’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – सिंगर कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या कनिका रुग्णालयात आहे. कनिका 10 दिवसांपर्वीच लंडनहून भारतात आली आहे. यानंतर उत्तर प्रदेशातून 8 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली. लखनऊला आल्यानंतर कनिकानं कोणतीही खबरदारी घेतली नाही. उलट तिनं 3-4 पार्ट्या अटेंड केल्याचं बोललं जात आहे. असा अंदाज आहे की, 400-500 लोक तिच्या संपर्कात आलीच असतील. ती ज्या पार्टीत गेली होती त्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही होत्या.

कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता नाव न घेता कुमार विश्वास यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कुमार म्हणाले, “देश-समाजातील अनेक जबाबदाऱ्यांपासून दूर राहणारे हे बौलिवुडिया चवन्नीए काही दिवस आपलं नाचणं-उड्या मारणं बंद करतील तर काय जगातील जाणीव संपुष्टात येणार आहे का ? यांना जरा तरी अंदाज आहे का की, मध्यम आणि गरीब कुटुंबातील लोकांना त्यांनी ही परदेशी प्रवासातून आणलेली महामारी दिली तर किती महागात पडेल.” भलेही कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये कनिका कपूरचं नाव घेतलं नाही, परंतु चाहते मात्र या पोस्टवर कनिकाशी संबंधित कमेंट करत आहेत.