सोनम कपूरनं वाढदिवशी पतीसाठी शेअर केली ‘स्पेशल’ पोस्ट, वडिल अनिल कपूरनं केली ‘अशी’ कमेंट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सोनम कपूर आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास मोक्यावर ती मुंबईत आपल्या कुटुंबासोबत आहे. पती आनंद आहुजा देखील तिच्यासोबत आहे. सोनमनं आनंदसाठी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. खास बात असी की, वडिल अनिल कपूरनंही यावर कमेंट केली आहे.

सोनमनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात सोनम लिहिते की, “जगातील सर्वात चांगला नवरा. मला ते सर्व काही देतो ज्याची मला वास्तवात गरज असते. माझ्या वाढदिवशी तो माझ्या ब्लेसिंग्स आहे. लव यु आनंद तेव्हापासून ज्या दिवशी मी तुला मिठी मारली आहे.

सोनमनं ही पोस्ट शेअर करताच सोशलवर व्हायरल होताना दिसली. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. खास बात अशी पती आनंद आहुजा आणि वडिल अनिल कपूरनंही यावर कमेंट
केली आहे. आनंदनं माझं जग असं म्हणत पृथ्वीचं चिन्ह वापरत कमेंट केली आहे. अनिल कपूरनं कमेंट केली आहे की, खूप सुंदर बर्थडे गर्ल.”

https://twitter.com/30Kumaar/status/1270294189469818881?s=20

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग, खूबसुरत, पॅड मॅन, संजू, प्रेम रतन धन पायो, नीरजा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.