लंडनला गेलेली सोनम कपूर ‘या’ कारणामुळं झाली प्रचंड ट्रोल, अभिनेत्रीनं दिलं जोरदार प्रत्युत्तर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सोनम कपूर पतीसोबत मुंबईतच रहात होती. परंतु आता लॉकडाऊनच्या काळात ती लंडनला पोहोचली आहे. खुद्द सोनमनंच यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर तिनं आऊटडोर वर्कआऊट केलं. याचा फोटोही तिनं सोशलवर शेअर केला होता. यानंतर सोनमला काही लोाकांनी ट्रोल केलं. यानंतर तिनं ट्रोलर्सला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.

सोनमनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक सेल्फी पोस्ट केला होता. या सोबत तिनं लिहिलं होतं, “आऊटडोर वर्कआऊट ग्लो.” यानंतर अनेकांनी तिचा फोटो शेअर केला. त्यांचं म्हणणं होतं की, लंडनला गेल्यानंतर लगेच तिनं क्वारंटाईनमध्ये राहायाल हवं होतं. अनेकांनी तिच्या बाहेर वर्कआऊट करण्याला नाव ठेवत विरोध केला. यानंतर तिनं लोकांच्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

सोनमनं एका ट्विटला रिप्लाय करत लिहिलं की, “मी माझ्या गार्डनमध्येच आहे जे माझ्या बिल्डींगला जोडूनच आहे. मी पूर्णपणे क्वारंटाईन आहे. लोकांकडे खूप वेळ आहे त्यांना इग्नोर करा.”

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग, खूबसुरत, पॅड मॅन, संजू, प्रेम रतन धन पायो, नीरजा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.