सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या विकिपीडियावरील टायमिंगबद्दल सोशलवर प्रश्न ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 27 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे. अशात आता विकिपीडिया पेजवरून काही सवाल उपस्थित केले जाताना दिसत आहेत. एक नवीन बाब मुंबई पोलिसांसमोर आली आहे जी सुशांतच्या विकिपीडिया पेजशीसंबंधित आहे. सुशांतच्या आत्महत्येची माहिती विकिपीडियावर आधीच म्हणजेच 8 वाजून 59 मिनिटांनी कशी अफडेट झाली असा सवाल सोशलवर केला जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येबद्दल जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, सुशांत सिंह राजपूत सकाळी जवळपास, 9.30 वाजता खोलीतून बाहेर आला होता. यानंतर तो ज्यूस पिला. यानंतर 10 मिनिटांनी तो त्याच्या खोलीत गेला होता. त्याच्या मृत्यूची बातमी 12 वाजताच्या आसपास समोर आली होती. त्यामुळं सोशल मीडिया युजर्स आता सवाल करत आहेत की, विकिपीडिया पेजवर अखेर आत्महतेची माहिती आधीच कशी अपडेट करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण समजून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली होती. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विकिपीडिया पेज युटीसी टाईमलाईनवर चालतं. जे भारतीय वेळेच्या 5.30 तास मागे आहे. म्हणूनच युजर्सला हा टाईम गॅप दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या मते, विकिपीडिया पेजसोबत कोणतीही छेडखानी करण्यात आलेली नाही.

https://www.jagran.com/entertainment/bollywood-sushant-singh-rajputs-wikipedia-page-was-edited-much-before-his-committed-suicide-20459802.html