TV अभिनेत्रीनं Ex Boyfriend च्या डोक्यात हातोडी घालून संपवलं , धक्कादायक कारण समोर

चेन्नई : वृत्तसंस्था – एका टीव्ही अभिनेत्रीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला बेदम मारहाण करुन त्याच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची धक्कादयक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. 42 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या घरी एक्स बॉयफ्रेंडला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात हातोडा घातला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असून गुन्हा केल्यानंतर अभिनेत्री एस. देवी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबुल केला. पोलिसांनी तिच्यासह तिची पती बी.व्ही. शकर यालाही अटक केली आहे.

मृत एम रवी (वय-38) हा चित्रपटात टेक्निशन म्हणून काम करत होता. देवी हे कृत्य करण्यामागचे कारण पोलिसांना सांगितले. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्यासोबत पुन्हा संबंध सुरु करण्याचा आग्रह धरत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर एस देवीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी एस देवी तसेच तिचा पती बी. शंकर, देवीची बहीण एस. लक्ष्मी आणि तिचा पती सावरियार यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीचे आणि टीव्ही मालिकांमध्ये किरकोळ भूमिका करणाऱ्या देवीचे आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते. दोन वर्षापूर्वी देवीच्या पहिल्या लग्नासंबंधी तिच्या पतीला माहिती मिळाली. यानंतर कुटुंबीयांनी आणि नवऱ्याने देवीला रविवारी दूर राहण्यास सांगितले. दरम्यान रविने देवीचा शोध घेऊन तिची माहिती मिळवली. रविवारी रवि देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी गेला. त्याठिकाणी त्याने लक्ष्मीला देवीसोबत पुन्हा एकत्र येण्याचा आग्रह धरला. यानंतर लक्ष्मीने देवीला बोलावून घेतले. देवी आणि तिचा नवरा घरी आल्यानंतर रविने आपली इच्छा बोलून दाखवली. यानंतर देवी तिचा पती आणि रवि यांच्यात भांडण झाले. याच भांडणातून देवीने काठीने मारहाण करून त्याच्या डोक्यात हातोडा घातला. यानंतर तिने स्वत: राजामंगल पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !