करिना कपूरने केलं ‘असे’ काही, ‘ट्रोल’ केल्यानंतर चहाते म्हणाले

मुंबई : वृत्तसंस्था – आपला अतिशय उत्तम आणि फॅशन सेन्समुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर हि तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे पुन्हा ट्रोल झाली आहे. तिच्या चाहत्यांनी तिचे सोशल मीडियावर फोटो शेयर केल्यामुळे करीना तु आता म्हातारी दिसते. असे तिच्या एका चाहत्याने तिला म्हंटल आहे.

ती स्वतः इंस्टाग्रामवर नाही. पण तिचे चाहते तिचे फोटो शेयर करत असतात. करीना सध्या सैफ अली खान आणि तैमूर सोबत इटलीतील टस्कनीमध्ये फिरायला गेली आहे. तिचा उन्हात काढलेला सेल्फी तिच्या टीमने शेअर केला आहे. तिने कोणताही मेकअप केलेला नाही. काळा गॉगल आणि फ्लोरल प्रिंटचा कला ड्रेस तिने घातला आहे. या फोटोवर प्रतिक्रया देताना चाहत्यांनी तिला तू म्हातारी दिसतेय असं म्हणून ट्रोल केलं आहे.

मागे ती बिकनीवरील एका फोटो मुळे ट्रोल झाली होती. करिनाने या फोटोवर प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे कि, आम्हाला पण भावनिक दृष्ट्या मन असत. आम्हालाही ह्रदय असत हे चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवं असं करिनाने प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे.