तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी येथील तरुणाला नांदेगाव येथील डोंगरात नेवून, हत्याराने वार करून त्याचा खून करणाऱ्या दोघांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायधिशांनी 27 जुलै पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आला होता.

मोनु उर्फ तरुण टाक (2O रा.पिंपरी) आणि जतीन मुकेश मेवाती (18 वर्ष रा.बोपखेल पुणे) या दोघांना अटक केली आहे. तर आदित्य खोत (२५, रा.पिंपरी) याचा खून करण्यात आला आहे. इतर आरोपी फरार आहेत.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e979c6eb-8ced-11e8-9749-3384bfe91cc0′]

आदित्य याला पिंपरी सुभाषनगर येथील घाटावरुन दुचाकीवर बसवून सिम्बॉयसेस कॉलेज रस्त्याने नांदेगाव परिसरात त्याला नेण्यात आले. रस्तावर दुचाकी थांबवून त्याला डोंगरात नेला. त्याच्यावर कोयत्याने व धारदार हत्याराने मानेवर आणि डोक्यात वार करण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह त्याच्या साथिदाराला पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले. तपास उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे करत आहेत.