उपमुख्यमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये ‘धूसपूस’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार ? महाविकासआघाडीकडून उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला देणार अशी चर्चा होती. परंतू आता उपमुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये धूसपूस सुरु असल्याचे कळते आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपद देण्यावर विचार सुरु आहे. पहिल्यांदा सांगितले जात होते की उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांना संधी मिळू शकते.

या तिन्ही पक्षात सत्तास्थापनेआधी देखील यावरुन चर्चा सुरु होती. त्यानंतर आता देखील यावर चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की गुरुवारी झालेल्या बैठकीत गृह, शहरी विकास, महसूल, बांधकाम खाते या मंत्रालयावर दावा केला आहे. असेही सांगण्यात येत आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष पदासाठी नकार दिला आहे. यानंतर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपद आणि एका अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी केली आहे.

एवढेच नाही तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याचे सांगण्यात येत होते. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अनेक नेत्यांमध्ये या विरोधात आवाज उठवला. राष्ट्रवादीत अजित पवार पुन्हा आले तरी पक्षातील काही नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत विविध मते आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर असलेल्या वादामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत देखील उशीर झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या दोन दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी तिन्ही पक्षाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Visit : Policenama.com