वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

आकुर्डी आणि पिंपरी रेल्वे स्थनकानजिक झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातामध्ये अभियंता आणि व्यापारी अशा दोघांचा मृत्यू झाला. या घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आल्या आहेत.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2445eef-842b-11e8-8150-b3865d856ae3′]

आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून एका अभियंत्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी सहाच्या सुमारास घडली. पांडुरंग लक्ष्मण दोडतोडे (34, रा. सायली अपार्टमेंट, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. पांडुरंग एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होते. सकाळी ते आपल्या कार्यालयात कामासाठी जात असताना रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात झाला.

पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून एका व्यापा-याचा मृत्यू झाला. हरीश दीपक करमयानी (32, रा. साई चौक, पिंपरी) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. हा अपघात आज (मंगळवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला. हरीश यांचा पिंपरीमध्ये व्यवसाय आहे. पहाटे रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला.