दुर्देवी ! टेरेसवर कॉफी पित होता युवक, अंगावर वीज पडून मुंबईतील 21 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीच्या छतावर बसून कॉफी पीत असताना अंगावर वीज पडून एका 21 वर्षीय (boy died on the spot after getting electrocuted ) तरुणाचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील खारघरमध्ये (navi mumbai) सेक्टर 12 जी येथे गुरुवारी (दि. 22) संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास नवीन मुंबई, मुंबई, ठाणे आदी परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यावेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

सागर विश्वकर्मा (वय 21) असे या मृत तरुणाच नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा पदवीच्या अंतीम वर्षाला होता. गुरुवारी संध्याकाळी तो निसर्गाचा आनंद घेत कॉफी पीत टेरेसवर बसला होता. त्यावेळी मुसळधार सुरु झाला. दरम्यान यावेळी जोरात वीजांचा कडकडाट झाला अन टेरेसवर वीज पडून फ्लोअरला तडा गेला.यात सागरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुण वयातच मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरंतर, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर कोणाच्या घरामध्ये पाणी घुसले आहे. पावसाच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याच्याही घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचा संकट असताना दुसरीकडे अस्मानी संकटही आल्याने नागरिक पुर्णतः हतबल झाले आहेत.

You might also like