ऑस्कर पुरस्कार : ‘ब्रॅड पिट’ सर्वोत्तम सहायक अभिनेता तर ‘लॉरा डर्न’ सर्वाेत्तम सहायक अभिनेत्री

लॉस एंजिलिस : वृत्तसंस्था – जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सोमवारी सकाळी सुरुवात झाली असून हॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट याला प्रथमच सर्वोत्तम सहायक अभिनेता म्हणून सन्मान मिळाला आहे. ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवुड’ मधील भूमिकेबद्दल ब्रॅड पिट याला सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. लॉरा डर्न हिला ‘मॅरेज स्टोरी’साठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जगभरातील प्रतिष्ठित ९२ व्या अ‍ॅकेडमी अवॉडर्सच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यास लॉस एंजिलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये सुरुवात झाली. ब्रॅड पिटच्या व्यतिरिक्त टॉम हैंक्स, एंथनी हॉपकिन्स, जोए पेस्की आणि अल पचीनो यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्यांसाठी नामांकन मिळाले होते. ब्रॅड पिटने आपला हा पुरस्कार आपल्या मुलाला अर्पण केला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी ऑस्कर
लॉरा डर्न हिचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसांचे तिला सर्वोत्तम बक्षीस मिळाले आहे. ‘मॅरेज स्टोरी’या चित्रपटातील भूमिकेबद्दल लॉरा डर्न हिला सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मार्गेट रॉबी, फ्लोरेंस पग, स्कारलेट जोहानसन, कैथी बेट्स यांना नामांकन मिळाले होते. वाढदिवसाचे इतके मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता नाही, असे तिने सांगितले. दक्षिण कोरियाच्या फिल्मला प्रथमच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. स्क्रिप्टरायटर बोंग जून हो आणि हान जिन यांना पैरासाइट या फिल्मसाठी उत्कृष्ट ऑरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कर देण्यात आला आहे.