मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अघातातून बचावले !

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले. मात्र, प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे पिए, एक इंजिनयर, पायलट आणि को पायलट असे पाचजण होते. हेलिगो चार्टर प्रा.लि. चे हे हेलिकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेसाठी रवाना झाले होते. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड दलदलीसारखे झाले असावे. दुपारी 4 वाजून 25 मनिटे आणि 30 सेकंदानी पेण-बोरगाव येथे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. त्यावेळी खाली चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातात रुतल्याचे सांगण्यात येत आहे.

चाक रुतल्याने पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळले. हेलिकॉप्टरचे सुखरुप लॅण्डींग झाल्यानंतर मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबद्दल अद्याप कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बचावले होते.

हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि त्यानंतर त्यांनी आपले काम करून परतले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.

visit : Policenama.com