स्तनांना सूज का येते ? जाणून घ्या ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलिसनामा ऑनलाइन – अनेक महिलांना स्तनांना सूज येते आणि त्या परेशान होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न घर करू लागतात. आज आपण यामागील कारणं जाणून घेणार आहोत. असं झालं तर काय करायला हवं याचीही माहिती घेणार आहोत. तसं तर डॉक्टर सांगतात की, स्तनांच्या रचनेत बदल झाला किंवा त्याच्या सभोवतालच्या त्वचेत बदल होतो तेव्हा सूज येते. स्तनांचा भाग जड वाटू लागतो. काही वेळा स्तनांना स्पर्श केल्यांतर वेदनाही होतात. इतकंच नाही तर स्तनांना स्पर्श केल्यानंतर त्यातील उबदारपणाही जाणवतो.

स्तनांना सूज नेमकी का येते ?

– स्तनांमध्ये फॅट टिश्यु, मिल्क डक्ट, ग्रंथी आणि कनेक्टीव टिश्यु अशा चार ऊती असतात. या ऊतींमधील बदलांमुळं स्तनांना सूज येते.
– जेव्हा चरबीच्या ऊतींमधील द्रवपदार्थांचं प्रमाण असंतुलित होतं. तेव्हा स्तनांमध्ये सूज येते.
– रजोनिवृत्तीच्या वेळी देखील हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळं स्तनांमध्ये सूज येते.
– मासिक पाळी सुरू होण्यापर्वी शरीरात इंस्ट्रोजन संप्रेरकाचं उत्पादनही वाढतं आणि या बदलानं स्तनांच्या दुधांच्या ग्रंथी वाढतात. यामुळं स्तनांची सूज वाढते.

स्तनांना सूज आल्यास काय करावं ?

– बर्फाचे तुकडे एक कपड्यात टाकून काही मिनिटं सुजलेल्या जागी शेकवा.
– एरंडेल तेल देखील वापरता येतं. यात असं अ‍ॅसिड असतं जे स्तनाचा दाह आणि सूज दूर करण्यास मदत करतं. एक चमचा एरंडेल तेल घ्या यात 2 चमचे साधारण तेल घ्या आणि मालिश करा.
– अनेकदा स्तनांना सूज आल्यास आधी तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते गर्भनिरोधक गोळ्या सुचवू शकतात. यामुळं स्तनात सूज येण्याची लक्षणं कमी होण्यास मदत होते.
– जर संसर्गामुळं सुज आली असेल तर डॉक्टर अँटीबायोटीक्स देतात.
– जर या सुजण्याचं कारण कर्करोग असेल तर त्याचीही स्थिती वेळेत ओळखली जाऊ शकते. यानुसार डॉक्टर थेरपी किंवा शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.