सख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10 जणांवर FIR

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – कारागृहात स्थानबद्ध असलेल्या सख्ख्या भावानेच साथीदाराच्या मदतीने बहिणीच्या पतीवर (मेव्हण्यावर) गोळ्या झाडून (Firing) निर्घृण हत्या (Murder) केली आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. यवतमाळ (Yavatmal) येथील स्टेट बॅंक चौकात बुधवारी (दि.23) रात्री साडेआठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नीने स्वत:च्या भावासह 10 जणांविरोधात शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात शहरातील एका गुन्हेगारी टोळीचा संबंध असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. brother had killed her husband sister complaint four arrest murder charge against 10 people in yavatmal

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

करण परोपटे (वय 26, रा. चांदोरेनगर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी आभा करण परोपटे (रा. राणी अमरावती, ता. बाभूळगाव) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार अक्षय आत्माराम राठोड (32), आशिष उर्फ बगिरा दांडेकर (30), शुभम बघेल (25) धीरज उर्फ बंड (25) गौरव गजबे (30), प्रवीण उर्फ पिके केराम (28 सर्व रा. यवतमाळ) दिनेश तुरकाने (25) रा. बाभूळगाव) कल्या उर्फ नितेश मडावी ( 28) , दिलीप ठवकर (30), अर्जून भांजा (27 तिघेही रा. दिघोरी नाका, नागपूर) आदीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अक्षय राठोडला मुख्य आरोपी तर अन्य नऊ जणांविरोधात सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल केले आहे

या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड अक्षय राठोड सध्या एमपीडीए कायद्यांतर्गत औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध आहे.
त्याने कारागृहातूनच या हत्याकांडाची सूत्रे हलवल्याचा संशय आहे.
मृत करण हा अक्षयचा मेव्हणा (भावजी) आहे. फिर्यादी आभा ही अक्षयची लहान बहीण आहे.
मृत करण हा रेतीचा व्यवसाय करीत होता.
त्यातील व्यवहाराच्या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका विनयभंगाच्या घटनेची किनारही या हत्याकांडामागे असावा,
असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
मात्र त्यांची नावे अद्यापही जाहीर केली नाहीत. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Titel : brother had killed her husband sister complaint four arrest murder charge against 10 people in yavatmal

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)