मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राइक’ करण्यास तयार होती वायुसेना, UPA सरकारनं दिली नाही परवानगी : धनोआ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईमध्ये 26 नोहेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करण्यासाठी वायुसेना तयार होती मात्र, सरकारने यांचा प्रस्ताव नाकारला होता. असे माजी हवाई दलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांनी शुक्रवारी व्हीजेटीआयच्या टेक्नोव्हांझाच्या वार्षिक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गटाला संबोधित करताना म्हटले. धनोआ हे 31 डिसेंबर 2016 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत भारतीय हवाई दलाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, ‘पाकिस्तानमध्ये अतिरेकी छावण्या कोठे कोठे होत्या ते आम्हाला माहित होते आणि आम्ही पुर्णपणे तयारीत होतो. पण स्ट्राइक करायचे की नाही करायचे हा सरकारचा निर्णय होता.’ धानोआनंतर आता हवाई दलाची कमांड एअर चीफ मार्शल राकेश कुमारसिंग भदौरिया यांच्या ताब्यात आहे. एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनूसार ते म्हणाले की, डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानविरोधात दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव दिला होता. जे मान्य केले नाही. आपल्या लोकांमध्ये पाकिस्तानकडून धोका निर्माण होण्याची भीती पाकिस्तानने कायम राखली आहे.

माजी एअर चीफ मार्शल म्हणाले की, जर शांतता आली असती तर पाकिस्तानने त्यांचे अनेक विशेषाधिकार गमावले असते. ते म्हणाले की, काश्मीरचा विषय पाकिस्तान मुद्दाम तापट ठेवतो. त्यांच्या मते पाकिस्तान या लढाईत सामील आहे आणि हल्ले करतच राहील. धनोआ म्हणाले, “वायुसेनामध्ये लहान, वेगवान युद्धे लढण्याची क्षमता आहे आणि भविष्यातील कोणतेही युद्ध भूमी, वायू, समुद्र आणि अंतरिक्षवर असेल.”

धनोआच्या मते भारतासमोर मोठे आव्हान म्हणजे त्याच्या शेजारी दोन अण्वस्त्र असलेले देश आहेत. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, परंतु त्याचा अर्थ चीन आणि पाकिस्तान असा होता. नंतर प्रश्नोत्तर अधिवेशनात धनोआ म्हणाले की, भारताची आण्विक क्षमता भूमी, समुद्र आणि वायूवर आहे. त्याच वेळी, चीनने एक आधुनिक वायूसेना विकसित केली आहे जी गुणवत्तेवर अवलंबून आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी वायूसेनाने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राइक केला. माजी एअर चीफ मार्शल म्हणाले की, या स्ट्राइकमुळे पाकिस्तानला हादरा बसला होता आणि पाकिस्तानी वायूसेनाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. ते म्हणाले, ‘त्यांच्या संरक्षण दलांमध्ये संयुक्त नियोजनाचा अभाव आहे आणि त्यांचे मनोबल कमी आहे.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/