BSNL | वर्षभराचा स्वस्तात बेस्ट प्लॅन्स ! अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, SMS सह आणखी काही सुविधा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BSNL | भारताची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना (Plan) आणत असते. एअरटेल (Airtel), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL अनेक विविध योजना आणत असते. अनेक लोक महिन्याला मोबाईल रिचार्ज (Recharge) करत असतात. तर अनेकजण वर्षाचा करत असतात. अशा लोकांसाठी BSNL ने फायदेशीर योजना आणली आहे.

 

दरम्यान, या प्लॅनमध्ये युझरला अनलिमिटेड डाटा (Unlimited data), कॉलिंग (Calling), एसएमएस (SMS) यासह अनेक फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये नेमकं काय आहे, हे जाणून घ्या. (BSNL)

1499 रुपयाचा प्लॅन – या प्लॅनमध्ये युझर्सला 24 जीबी डेटा (24 GB data) दिला जाणार आहे. तर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सेवा दिली जाईल. तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ही 365 दिवसांची आहे. या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा केवळ 125 रुपये मोजावे लागणार आहेत. (BSNL)

 

2399 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. तर, यात 75 दिवसांची अतिरिक्त वैधताही मिळते. यात अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग देण्यात आली आहे. तर, 100 एसएमएस दैनंदिन दिले जात आहेत. तर 3 जीबी दैनंदिन डाटा दिला जातोय. या प्लॅनची एकूण वैधता ही 440 दिवसांची आहे. यात युझर्सला इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सेवेचे सब्स्क्रिप्शन दिले जातेय. याचा प्रतिमहिना खर्च सुमारे 199 रुपये इतका पडतो.

 

1 हजार 999 रुपयाचा प्लॅन – यामध्ये युझर्सला 600 जीबी डाटा दिला जातोय.
तर, डाटा लिमिट संपल्यावर युझर्सला 80 केबीपीएस स्पीड मिळणार आहे.
त्याचबरोबर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातील.
यात इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सर्व्हिसचा ॲक्सेसही दिला जाईल. त्याचा दर महिन्याचा खर्च हा सुमारे 166 रुपये असणार आहे.

 

Web Title :- BSNL | cheap and cool plans run by bsnl all year round get unlimited voice calling data sms

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा