BSNL नं आपल्या 499 रूपयाच्या Bharat Fiber प्लॅनमध्ये केले मोठे बदल, आता Jio Fiber ला देणार ‘टक्कर’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारताची सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या यूजर्सची सुविधा लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने Bharat Fiber प्लॅनअंतर्गत येणाऱ्या 499 च्या प्लॅन उपलब्धता वाढवली आहे. या प्लॅनची वैधता 31 मार्चपर्यंत होती परंतु आता कंपनीने 29 जून करण्यात आली आहे. कंपनीचा हा एक प्रमोशनल बेसिस प्लॅन आहे.

BSNL च्या अधिकृत वेबसाइटनुसार देण्यात आलेल्या माहितीनुसार आता 499 रुपयांच्या Bharat Fiber प्लॅनची उपलब्धता वाढवून 29 जून केली आहे. हा प्लॅन अंदमाना आणि निकोबार सर्कल सोडून त्या सर्व क्षेत्रात उपलब्ध आहे, जेथे Bharat Fiber सेवा पुरवली जाते.

या प्लॅन अंतर्गत यूजर्सला 29 जून पर्यंत 100 जीबी डाटा प्राप्त होईल. यूजर्स 20Mbps च्या स्पीडने इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. तर 100GB चा डाटा संपल्यावर यूजर्स 2Mbps ने इंटरनेट डाटा वापरु शकतील. या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डाटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लॉकल आणि एसटीडी कॉल्स मिळतील.

BSNL ने आपल्या 96 रुपयांचा लोकप्रिय प्लॅन Vasantham Gold ची वैधता 90 दिवसांनी वाढवली आहे. आता यूजर्स या प्लॅनचा लाभ 30 जून 2020 पर्यंत घेऊ शकतात. ही प्लॅन सध्या फक्त चेन्नई आणि तमिळनाडू या दोन राज्यात उपलब्ध आहे. हा कंपनीचा एक प्रोफेशनल प्लॅन आहे आणि कंपनीच्या नव्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. BSNL च्या जुन्या यूजर्सला या प्लॅनचा लाभ घेता येणार नाही. कंपनीने 96 रुपयांची वैधता देखील वाढवली आहे आणि काही अन्य बेनिफिट्स देखील दिले आहेत. यात यूजर्सला प्रतिदिन 250 मिनिट व्हाइस कॉलिंग मिळेल, ज्यात लोकल आणि एसटीडी कॉल्सचा समावेश आहे. याद्वारे यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर कॉल करु शकतात. याशिवाय यात 100 एसएमएस प्रतिदिन मिळतील.