BSNL च्या ग्राहकांना झटका ! ‘या’ सर्वांच्या ‘पसंती’च्या प्लॅनमध्ये झाला मोठा बदल, नाही मिळणार खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बीएसएनएलने (BSNL) आपल्या प्रीपेड ग्राहकांना मोठा झटका दिला. कंपनीने आपल्या पॉप्युलर प्लॅनची वैधता कमी करण्यासह काही बदल देखील केले आहेत. काही वृत्तानुसार बीएसएनएलने 1,699 रुपयांच्या वार्षिक प्लॅनची वैधता कमी करुन ती 300 दिवसांची केली आहे. कंपनीने 365 दिवसांचा वैधता प्लॅन बाजारात आणला होता.

कंपनीने यासह मिळणारे काही बेनिफिट्स देखील कमी केले आहेत. प्लॅनच्या ग्राहकांना 100 SMS फ्री आणि 2GB इंटरनेट डाटा देण्यात येतो. बाकी बेनिफिक्ट्स म्हणून यात 250 मिनिटांचे डेली कॉलिंग देखील दिले जाते.

या प्लॅनमध्ये देखील झाले बदल –
याशिवाय बीएसएनएलने 98 रुपये, 99 रुपये, 319 रुपयांच्या आपल्या स्पेशल टॅरिफ वाऊचर्समध्ये या प्रकारचा बदल केला आहे. कंपनीने या तीन प्लॅनची वैधता देखील कमी केला आहे. ग्राहकांना आता 98 रुपयांच्या वाऊचरमध्ये 22 दिवसांची वैधता आणि 2 जीबी डाटा मिळेल.

तर 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी 250 मिनिट आणि वैधता 22 दिवस करण्यात आली आहे. तर 319 रुपयांच्या प्लॅनची वैधता 85 दिवस करण्यात आली आहे तर 84 दिवसांचा हा प्लॅन पहिल्यांदा बाजारात आणण्यात आला होता. ग्राहकांना यात कॉलिंगसाठी दिवसाला 250 मिनिट मिळतील.