शेतकऱ्यांसाठी ‘ई-मंडई’चे गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारचा नवा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर आता शेतकऱ्यांसाठी नवनव्या योजना आणत आहे ज्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, यासाठी आता सरकार ई-मंडई या आपल्या योजनेच्या विस्तार करणार आहे. त्यासाठी सर्व राज्यातील ई-मंडई एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने करण्याचा विचार केला आहे.

ई-मंडईचा आवाका वाढणार
ई-मंडईचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करणार आहे. ज्यातून शेेेतकऱ्यांला आपला माल थेट ग्राहकाला विकता येईल आणि त्यातून थेट आणि आधिक जास्त नफा मिळेल. या ई-मंडईचा आवाका वाढवण्यासाठी आणि राज्यांमधील व्यवहार करता यावा यासाठी सर्व राज्यातील मंडई लवकर एकमेकांना जोडण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने केला आहे. मंगळवार कृषि क्षेत्राशी संबंधित तज्ञ आणि शेतकरी संघटना यांनी अर्थसंकल्पासंबंधित काही सूचना दिल्या आहेत. सरकार यंदाच्या वित्त वर्षात २०१९-२० मध्ये अर्थसंकल्पात फूड प्रोसेसिंग आणि एग्रीकल्चर प्रोडक्टसच्या निर्यातीला प्रोस्ताहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढऴण्यावर लक्ष देत आहे.

हा आहे मोदी सरकारचा शेतकऱ्यांचे उत्पन वाढवण्याचा प्लॅन
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार देशात ई-मंडईचा आवाका वाढवणार आहे, ज्यातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणाहून विविध राज्यात आपला माल विकता येईल. आणि थेट माल विकल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यासाठी देशात अजून २०० पेक्षा आधिक ई-मंडई वाढवण्यात येणार आहे. आता देशात ५८५ ई-मंडई आहेत. आता यात वाढ होऊन त्याची संख्या ७०० पेक्षा आधिक होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे