कलयुग ! पतीनं पत्नीला 4 लाखात ‘विकलं’, नंतर झाला ‘गँगरेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात बलात्कारासारखे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या काही दिवसात अनेक बलात्काराचे प्रकरण घडले, त्यांचे निखारे अजून शांत होत नाहीत. तशातच बुलंदशहरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेला तिच्या नवऱ्याने ४ लाख रुपयांना विकून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेची खरेदी करणाऱ्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

पीडित महिलेने माहिती दिली की, ‘माझं लग्न अजित सिंह याच्याशी झालं होतं. मात्र नंतर त्याने मला घरातून काढून टाकलं. त्यानंतर मी माहेरी आले, पण माहेरच्या लोकांनीही मला स्वीकारलं नाही,’ असा आरोप पीडितेने केला आहे. तसंच मी राहत असलेल्या गावात देखील माझ्या पतीचं नेहमी येणंजाणं होत होतं. त्या गावात तो नेहमी पप्पन आणि रामवती या दोन मित्रांकडे येत असे. हे दोघे स्वत:ला भक्त समजत होते आणि दरबार भरवत होते. त्यामुळे मी त्या दोघांकडे आमच्या भांडणातील तोडगा काढण्याची विनंती केली होती’ अशी माहिती पीडितेनी दिली आहे. तसेच ‘आमच्यातील वाद सोडण्यावण्यासाठी त्या दोघांनी माझ्या पतीला आणि गावातीलच एक रहिवासी अजब सिंह याला बोलावलं. पण पती-पत्नीतील भांडण सोडवण्याऐवजी त्यांनी मला अजब सिंह या व्यक्तीला चार लाखांना विकून टाकलं,’ असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

पीडित महिलेने सांगितले की, ‘ज्या व्यक्तीला मला विकण्यात आलं होतं त्या अजब सिंह आणि त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर अजब सिंहने मला बळजबरीने एका घरात नेऊन ठेवलं. मी पळून गेले तर माझ्या मुलींना मारून टाकू, अशी धमकी मला देण्यात आली होती,’ असं पीडित महिलेचं म्हणणं आहे. झालेल्या प्रकारानंतर महिलेला ज्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते त्या खोलीतून पीडित महिला कशीबशी सुटली आणि तिने थेट पोलीस स्थानक गाठले. त्यानंतर याप्रकरणी महिलेची तक्रार दाखल करण्यात आली असून या नराधमांचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला असल्याचे समजते.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like