जेवायला बोलावून केला मित्राचा ‘खात्मा’, 6 दिवस पोलिसांसोबतच फिरणार्‍या आरोपीला अखेर अटक

बुलंदशहर : पोलीसनामा ऑनलाइन –  पैशाच्या व्यवहारावरुन सख्ख्या मित्राने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुलंदशहर परिसरात समोर आला आहे. खुर्जा येथील विक्की आणि बुलंदशहर येथील वकील धर्मेंद्र चांगले मित्र होते. या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरुन भांडण झाले आणि विक्कीने आपल्या मित्राचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला.

विक्कीने त्यासाठी सापळा रचून आपल्या मित्राला जेवायला बोलवले. जेवण्याच्या बहाण्याने विक्कीने धर्मेंद्रला तीन महिन्यात २५ वेळा धर्मेंद्रला जेवायला आपल्या कारखान्यात बोलवले. पण त्याला धर्मेंद्रला मारण्याची योग्य संधी भेटत नव्हती. मात्र, २६ व्या वेळी जेवण्याआधीच विक्किन त्याचा खून केल्याचं पोलिसांसमोर सांगितलं.

असा रचला हत्येचा प्लॅन

विक्कीने धर्मेंद्रला जेवणासाठी तीन महिन्यात २५ वेळा फोन केला होता. बुलंदशहरातून खुर्जा लांब असून धर्मेंद्र जायचा कारण तेथील चीज- बटाटे प्रसिद्ध होते. मात्र, विक्की दोन नोकरांसोबत धर्मेंद्रची हत्या करण्यासाठी त्याला बोलवत होता. पोलिसांना विक्कीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकवेळी त्यांच्या मित्रांना जेवण्याच्या प्लॅनबाबत कळायचे आणि ते तेथे पोहचायचे. २५ जुलै च्या रात्री विक्कीने पुन्हा धर्मेंद्रला बोलवले. तेव्हा त्याचे नोकरही तयार होते. त्यावेळी तिघांनी जेवणाची तयारी न करता धर्मेंद्रची हत्या केली. ओळख कळू नये म्हणून धारदार शस्त्रांनी धर्मेंद्रच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. नंतर गोदामातच तयार केलेल्या सेफ्टी टँकमध्ये मृतदेह पुरण्यात आला.

धर्मेंद्रचा शोध घेण्यासाठी ६ दिवस पोलिसांसोबत होता विक्की

कुटूंबीयांनी धर्मेंद्र घरी न आल्याने बुलंदशहर मध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरु केले. विक्कीने पोलिसांसोबत मित्राचा शोध सुरु केला. ज्या जंगलात धर्मेंद्रची दुचाकी सापडली तिथे पोलिसांनी ड्रोनद्वारे शोधही घेतला, पण तो सापडला नाही. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी पोलिसांना खबऱ्यांनी धर्मेंद्रची हत्या केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विक्कीच्या गोदामाची तपासणी केली असतात. पोलिसांना गोदामात पुरलेला मृतदेह सापडला. त्याप्रकरणी पोलिसांनी विक्की आणि त्याच्या दोन नोकरांना अटक केली आहे.