Buldhana Crime | चक्क 10 रुपयांसाठी मित्रानेच मित्राची केली हत्या; बुलढाणा जिल्ह्यात खळबळ

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Crime | बुलढाणा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Buldhana Crime) समोर आली आहे. येथील मित्रांनीच एका 50 वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे चक्क दहा रुपये देण्यास नकार दिल्याने ही हत्या केली आहे. आरोपींनी हे पैसे दारुसाठी मागितले होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून आरोपींकडून डोक्यावर काठीने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, 50 वर्षीय पीडित भागवत सीतारामा फासे (Bhagavat Seetaram Fase) आपले मित्र विनोद वानखेडे (Vinod Wankhede) आणि दिलीप (Dilip) यांच्यासोबत मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. यावेळी विनोद आणि दिलीप यांनी भागवत यांच्याकडे बारमध्ये गेले असता 10 रुपये मागितले. भागवत यांनी पैसे देण्यास नकार दिला असताना ते संतापले. भागवत बारमधून बाहेर जात असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यावर मागून काठीने हल्ला केला. हल्ल्यानंतर भागवत तिथेच खाली पडले आणि मृत्यू झाला.
दरम्यान घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले होता. त्यावेळी भागवत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
यानंतर एका तासांनतर पोलिसांनी आरोपींच्या (Buldhana Crime) मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, पोलीस अधिकारी प्रल्हाद काटकर (Pralhad Katkar) यांच्या माहितीनुसार, दारुच्या दुकानात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचा फोन आम्हाला आला होता.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर एका तासात आम्ही आरोपींना अटक (Arrested) केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Buldhana Crime | friends kill man for refusing to give them rs 10 for alcohol in buldhana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update