धक्‍कादायक ! महिला प्रसुती झाल्यानंतर मुलासह तिच्या पोटातून निघालं ‘असं’ काही, डॉक्टर देखील झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील हाजीपूरमध्ये हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका गर्भवती महिलेने एका मुलाला जन्म दिला. मात्र या महिलेच्या पोटातून विचित्र वस्तू निघाल्याने डॉक्टर देखील चक्रावून गेले. या महिलेच्या पोटातून डॉक्टरांना बंदुकीची गोळी देखील आढळून आली.

जीपूरमध्ये राहणाऱ्या रुपाला काल पोटामध्ये एका जागी दुखायला लागले. त्या ठिकाणी जखम झाल्याचे आढळून आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला दवाखाण्यात भरती केले असता तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र पोटातून मुलाबरोबरच पोलिसांना एका बंदुकीची गोळी देखील आढळून आली.

त्यानंतर डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. या घटनेविषयी महिलेने दिलेल्या माहितीनुसार हि महिला संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर बसलेली असताना एक मोठा आवाज झाला. मात्र तिला काय झाले हे कळलेच नाही. थोड्यावेळाने तिच्या पोटामध्ये दुखू लागल्याने तिने कुटुंबियांना सांगितले. मात्र कुटुंबीयांनी या गर्भार कळा समजून याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिला दवाखान्यात भरती केले. मुलाचा जन्म झाल्यानंतर डॉक्टर देखील आवाक झाले. कारण महिलेच्या पोटाला देखील या गोळीमुळे काहीही इजा झाली नव्हती त्याचबरोबर पोटातील बाळाला देखील याचा अजिबात त्रास किंवा जखम झाली नाही.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून गोळी कुठून मारली गेली आणि कुणी मारली याचा तपास केला जात आहे.