गाडीचे टायर पंक्चर करुन व्यापाऱ्याला लुटले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याकडील सव्वा दोन लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मदनी चौकात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मोंढ्यातील व्यापारी रात्री दुकान बंद करुन घरी चालले होते. व्यापारी दुकानातून बाहेर निघाल्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या कारवर ऑईल फेकले. त्यानंतर टायर पंक्चर केले. व्यापारी पंक्चर काढण्यासाठी जाताच पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेले सव्वा दोन लाख रुपये चोरुन नेले. औरंगाबाद पोलीस अधिक तपास करीत आहेत.