पुण्यात विदेशी प्रेयसीला डांबून मारहाण ; उद्योगपतीच्या पोराला अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात शिक्षणाकरिता आलेल्या इराणी तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढून तिला डांबून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथिल ही घटना आहे. दरम्यान तिचा प्रियकर एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. हा प्रियकर तिला सिगारेटचे चटके देखील देत असल्याचे तरुणीने सांगितले आहे.
तो देत होता सिगारेटचे चटके 
या इराणी तरुणीला तिच्या प्रियकराने सिगारेटचे चटके दिले. अखेर याप्रकाराची माहिती तिने मैत्रिणीला दिली. पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मुंबईतील एका बड्या उद्याोजकाचा मुलगा असल्याचे समजते.
तीन वर्षाच्या विद्याार्थी व्हिस्सावर भारतात

या प्रकरणी धनराज अरविंद मोरारजी (वय ४८,रा. मित ऑलम्पस सोसायटी, कोरेगाव पार्क) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका तीस वर्षीय इराणी तरुणीने  कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची इराणमधील तेहरान शहरातील रहिवासी आहे. तिने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. इराणमध्ये तिने काही काळ काम केले. त्यानंतर ती वर्षभरापूर्वी विद्याार्थी व्हिस्सावर भारतात आली. पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका संस्थेत ती संगणक अभ्यासक्रम करत आहे.

दरम्यान, इराणमधील मैत्रिणीच्या माध्यमातून तिची धनराज मोरारजीशी ओळख झाली. त्यानंतर धनराजने तिला प्रेमाची गळ घातली. ‘तुझा भारतात राहण्याचा खर्च तसेच पुण्यातील निवासाची व्यवस्था करेल,’असे धनराजने तिला सांगितले होते.

धनराज आणि इराणी महिला कोरेगाव पार्क भागातील सदनिकेत एकत्र राहत होते. सुरुवातीला धनराजने मला चांगली वागणूक दिली. त्यानंतर त्याने किरकोळ कारणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. मला मारहाण केली. सिगारेटचे चटके दिले. मी घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मला डांबून ठेवले, असे इराणी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
महिला पत्रकाराकडून प्रकरण उघडकीस 
धनराजकडून मला मारहाण करण्याचे प्रकार सुरु होते. त्याच्या मारहाणीला मी कंटाळले होते. त्याने घरातून बाहेर पडू नये म्हणून कुत्रे दारात बांधून ठेवले होते. अखेर मी एका मैत्रिणीबरोबर संपर्क साधला आणि या प्रकाराबाबतची माहिती दिली. मैत्रिणीने एका पत्रकार महिलेला या घटनेची माहिती दिली. रविवारी मध्यरात्री माझी मैत्रिण आणि पत्रकार महिला पोलिसांना घेऊन धनराजच्या सदनिकेत आली. पोलिसांनी माझी सुटका केली, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विद्याा राऊत तपास करत आहेत.