नाशिकच्या व्यापाऱ्याची धुळ्यातील लाॅजमध्ये आत्महत्या, शहरात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पाचकंदिल चौकातील एका नव्याने सुरु झालेल्या लॉज मध्ये नाशिक येथील व्यापाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संभाजी धोंडू पाटील (४५, रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यापारी संभाजी पाटील हे काही कामानिमीत्त नाशिकहुन धुळ्यात आले होते. ते पाचकंदिल चौकातील नविनच सुरु झालेल्या लॉज मध्ये थांबले होते. दुपारी गावातील कामकाज आटोपून ते परत लॉज मधील खोलीत गेले. बराच वेळ झाला तरी रुमचा दरवाजा उघडत नसल्याने मंगळवारी सायंकाळी हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. अनेकवेळा आवाज देवूनही आतून काहीही आवाज न आल्याने कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली.

रुममध्ये झरोक्यातून डोकावून पाहिले असता संभाजी पाटील जमिनीवर पडलेल्याचे दिसले. त्यांच्या जवळच एक किटकनाशकाचा डब्बा जमिनीवर पडलेला दिसल्याने त्यांनी विष पीऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. लॉजमध्ये व्यवसायिकांने आत्महत्या केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर लॉज जवळ परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

कर्जबाजारीपणामुळे ही आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे. हॉटेल मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पाटील यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. पुढील तपास जिल्हा पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like