खुशखबर ! सरकारकडून 1500 रूपयांनी ‘स्वस्त’ सोने खरेदीची संधी, होणार ‘हे’ 3 फायदे

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – जर तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आपण आज एका चांगल्या ऑफरबद्दल जाणून घेणार आहोत. सरकारच्याच एका स्किमद्वारे तुम्ही आता बाजारभावापेक्षा स्वस्त किंमतीत सोने खरेदी करू शकता. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) नावाची सीरीज आज (सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी) लाँच झाली आहे. या स्किममध्ये तुम्ही ९ ऑगस्टपर्यंत सोनं खरेदी करू शकता. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या नव्या योजनेसाठी ३४९९ रुपये प्रतिग्रॅम अशी किंमत निश्चित केली आहे. याशिवाय ३ ऑगस्टनुसार, सोन्याच्या बाजारभावाबद्दल बोलायचे झाले तर तो ३६७४ रुपये प्रतिग्रॅम आहे. सरकारच्या या स्क्मिनुसार जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर १७५ रुपये प्रतिग्रॅम स्वस्त पडेल. खास बात अशी की, गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तु्म्हाला व्याजही मिळणार आहे. याशिवाय ऑनलाईन खरेदी केल्यानंतर ५० रुपयांची सूटही मिळणार आहे.

येथून खरेदी करा सोनं

या गोल्ड बॉन्डची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफिस आणि एनएसई तसेच बीएसईद्वारे होणार आहे.

काय आहे ही स्किम ?

सॉवरेन गोल्ड बॉन्डची सुरुवात नोव्हेंबर २०१५मध्ये झाली होती. याचा हेतू सोन्याच्या मागणीत कमी आणण्याचा आणि सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत आर्थिक बचतीत वापरली जावी हा होता. घरातच सोनं खरेदी करून ठेवण्यापेक्षा तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक कराल तर तुम्ही टॅक्सही वाचवू शकता.

ऑनलाईन पेमेंटवर अतिरीक्त सवलत

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, “आरबीआयसोबत सल्लामसलत करून ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट केल्यानंतर सरकारने निश्चित केलेल्या किंमतीवर भारत सरकारने ५० रुपये प्रतिग्रॅमची सवलतही दिली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची देय रक्कम ३१६४ रुपये प्रतिग्रॅम असेल.

२.५ टक्के वार्षिक व्याज

या स्किमनुसार, सुरुवातीच्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे.

कॅपिटल गेन टॅक्सचीही होऊ शकते बचत

बाँडच्या किंमती सोन्याच्या किंमतीतील अस्थिरतेवर अवलंबून असतात. सोन्याच्या किंमतीत होणारी घसरण गोल्ड बॉन्डवर नकारात्मक रिटर्न देते. या अस्थिरतेला कमी करण्यासाठी सरकार दीर्घ कालावधीचे गोल्ड बॉन्ड जारी केले आहेत. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी 8 असतो. परंतु तुम्ही पाच वर्षांनंतरही आपले पैसे काढून घेऊ शकता. पाच वर्षांनी पैसे काढल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्सदेखली लावला जात नाही.

मिळू शकतं कर्ज

गरज पडल्यास सोन्याच्या ऐवजात बँकेतून लोनही घेतलं जाऊ शकतं. गोल्ड बॉन्ड पेपर कर्जासाठी कॉलेटरलच्या रुपातही वापरले जाऊ शकतात. हे पोस्ट ऑफिसमधील नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट सारखं असतं.

आरोग्यविषयक वृत्त