CAA : परवेज मुशर्रफ यांची इच्छा असेल तर घेऊ शकतात भारतीय ‘नागरिकत्व’, भाजपच्या ‘या’ खासदारानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले परवेज मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्याविषयी भाष्य केले आहे. परवेझ मुशर्रफ हे दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असून त्यांना पाकिस्तानमध्ये छळ सहन करावा लागत असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे, त्यावेळेस आम्ही त्यांना जलदगती आधारावर नागरिकत्व देऊ शकतो, असे ट्विट भाजप नेते व राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. मुशर्रफ हे दर्यागंजचे असून सध्या त्यांना पाकिस्तानमध्ये छळ सहन करावा लागत आहे. स्वत: ला हिंदूंचे वंशज समजणारे सर्व लोक नवीन नागरिक सुधारणा कायद्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना नागरिकत्व दिले जावे, असेही त्यांनी म्हणले आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष कोर्टाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने ७६ वर्षीय मुशर्रफ यांना दीर्घकाळ चाललेल्या देशद्रोहाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली.

हे प्रकरण २००७ मधील घटना स्थगित करणार आणि देशात आणीबाणी लागू करणार आहे, जो एक दंडनीय गुन्हा आहे. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले की, त्यांनी तीन महिन्यांपासून या प्रकरणातील सर्व तक्रारी, नोंदी, उलट तपासणी आणि वस्तुस्थितीची चौकशी केली असून पाकिस्तानच्या घटनेच्या कलम ६ नुसार मुशर्रफ यांना देशद्रोहासाठी दोषी ठरवले. त्यांच्यावर घटनेत छेडछाड केल्याचा आरोप आहे.

परवेझ मुशर्रफ सध्या दुबईत आहेत. हृदय आणि रक्तदाब संबंधित समस्येच्या तक्रारीनंतर त्यांना ३ डिसेंबर रोजी दुबईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७६ वर्षीय माजी राष्ट्रपतींना स्ट्रेचरवर रुग्णालयात आणण्यात आले. परवेझ मुशर्रफ हे २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. २००८ मध्ये ते देश सोडून निघून गेले. यानंतर मार्च २०१३ मध्ये ते पाकिस्तानात परतले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/