तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा; अजामीनपात्र गुन्हा मात्र दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मिळवता येणार 

नवी दिल्ली:वृत्तसंस्था

मागील अनेक दिवसापासून तिहेरी तलाक मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भातील विधेयकातील  बदलांना मंजूरी दिली आहे. इतर पद्धतीने तलाक दिल्यास तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. मात्र दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मिळवता येईल, असा बदल करण्यात आला आहे.

विद्यामान केंद्र सरकार 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच तिहेरी तलाक विधेयक मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू या विधेयकातील काही तरतूदींना विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळेच हे विधेयक राज्यसभेत अद्याप मंजूर झालेले नाही. अशामध्येच मंत्रिमंडळाने किरकोळ बदल करत या विधेयकाला मंजूरी दिली आहे.
[amazon_link asins=’B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1592dd8-9bcc-11e8-99cc-47fe1a03ea40′]
तिहेरी तलाक विधेयाकावरुन राज्यसभेत मागील सत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली होती.दोघेही स्वतःच्या मागणीवर ठाम होते.एवढेच नाहीतर, तिहेरी तलाक विधेयकावरुन केवळ संसदेमध्येच नाही तर सभांमध्ये देखील भाजप आणि काॅंग्रेसने एकमेकांवर टीका केली आहे.

[amazon_link asins=’B07CVGTZML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2cedaa5-9bcc-11e8-aac2-99c570fe47a8′]