..म्हणून होणार एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राज्याच्या सरकारला जनतेप्रती मायेचा उमाळा दाटला आहे. कारण उद्या शुक्रवारी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत ५० निर्णय घेतले जाणार असून या निर्णयातून राज्यातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

९ मार्च ते ११ मार्च या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या आचारसंहितेपूर्वी राज्य शासन राज्यातील जनतेला मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. या आठवड्यात पहिली मंत्रिमंडळ बैठक ५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या बैठकीत लोकांच्या पसंतीला उतरणारे २२ निर्णय घेण्यात आले होते. आता ८ मार्चला दुसरी मंत्रिमंडळ बैठक पार पडणार असून यात  तब्बल ५० निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

उद्या होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व खात्यांच्या सचिवांकडून लोकप्रिय आणि जनहिताच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्याची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट होणार आहे. मंत्री मंडळाच्या विशेष बैठकी पूर्वी उद्धव ठकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात होणाऱ्या बैठकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

खासदार आणि आमदार यांच्या मतदारसंघावर सकारात्मक प्रभाव पडणारे निर्णय घेण्यासाठी राज्य शासनावर मोठा दबाव टाकण्यात येतो आहे. त्यामुळे मंत्री मंडळाच्या बैठकीतून जनतेसाठी नेमकी कोणती खुशखबर येते आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ह्याही बातम्या वाचा –

गडकरींना राग अनावर … म्हणाले ‘गप्प बसा… नाहीतर थप्पड खाल’ 

हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर ; “या” मतदार संघातून लढवणार निवडणूक

पुणे : काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

‘सामना’ ने घेतला यू-टर्न ; सरकाराचे ‘रेकॉर्डब्रेक’ कौतुक