OBC समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती, ठाकरे सरकारकडून आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठीकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी कुठलीही ठोस घोषणा केली नाही, त्यांनी आमची घोर निराशा केली, अशी घोषणा ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. आजच्या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्ता भरणे आणि ओबीसी नेते, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील व निधीही प्राधान्यक्रमानुसार दिला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी संघर्ष समितीचे जे.डी. तांडेल म्हणाले कि एका विशिष्ट समाजाच्या मागण्या लगेच मान्य केल्या जातात आणि ओबीसींना न्याय दिला जात नाही.

आमची आज मंत्रिमंडळ उपसमितीवर मुख्यमंत्र्यांनी बोळवण केली, आम्ही खूप अपेक्षा घेऊन आलो होतो. मुख्यमंत्री सकारात्मक होते; पण त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही असे ओबीसीं नेत्यांचे म्हणणे आहे. एमपीएससीची रविवारची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली.मराठा आरक्षणाच्या विषयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.आजच्या बैठकींना प्रकाश शेंडगे, शंकरदादा पाटील, चंद्रकांत बावकर आदी नेते उपस्थित होते.