तलवारीने केक कापणे पडले महागात, 11 जणांविरोधात गुन्हा

नाशिकः पोलीसनामा आॅनलाईन-

तुम्ही जर तुमच्या किंवा मित्राच्या वाढदिवसा दिवशी तलवारीने केक कापत असाल किंवा कापण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण देवळाली गावातील म्हसोबा मंदिरासमोरील कापड दुकानासमोर एकाने वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापला. त्यानंतर मोठमोठ्याने गाणी म्हणून परिसरात आरडा अोरडा केला. संपूर्ण प्रकरण पोलीसात गेले. याप्ररकणी 11 संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. इंद्रजित दशरथ विश्‍वकर्मा (24, रा. हांडोरे मळा, वडनेरगेट, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fed933df-8a89-11e8-b75b-f33fb6cc8ac7′]

नाशिकरोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली गावात असलेल्या म्हसोबा मंदिरासमोर एक कापड दुकान आहे. मंगळवारी (ता.17) रात्री पावणेनऊ-नऊ वाजेच्या सुमारास दहा-अकरा जणांचे एक टोळके त्या ठिकाणी जमले. यावेळी त्यांच्यातील एकाचा वाढदिवस असल्याने त्यांनी केक आणला होता. त्यानंतर दुचाकीच्या सीटवर केक ठेवून एकाने तलवारीने तो केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि मोठमोठ्याने गाणी म्हणत रस्त्यावर धिंगाणा घातला.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याची चाहूल लागताच टोळक्याने पोबारा केला. मात्र इंद्रजित विश्वकर्मा हा पोलिसांच्या हाती लागला.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03d3eb92-8a8a-11e8-9dd7-edf1fb1ec4d6′]
याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात बेकायदेशीररित्या जमाव करून जमावबंदी आदेशाचा भंग करणे, शांततेचा भंग करणे, तलवार बाळगणे असे गुन्हे दाखल करण्यात आले असून, फरार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.