Restrictions in Maharashtra | लॉकडाउन बद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले? मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाचे संकट (Coronavirus) अधिकच तीव्र होताना दिसत आहे. दैनंदिन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्याची (Restrictions in Maharashtra) चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) अधिक सतर्क झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रालयातील बैठक (Ministry Meeting) संपली आहे. मागील दोन दिवस झाली कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. यामुळे आज वैद्यकीय शिक्षण विभागाची (Department of Medical Education) बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव, संचालक यांच्याकडून कोरोनाबाबत आढावा घेण्यात आला,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

‘महाराष्ट्रात तूर्तास लॉकडाऊनची (Lockdown) आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे, मात्र, आपल्याला यावरती कोणते निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा सुरु आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना (Doctor) कोरोनाची लागण झाली असून याची नोंद घेतली आहे. सध्या उपचार व्यवस्था आहे. परंतु, यामध्ये मार्डच्या मागणीबाबत चर्चा झाली आहे. त्यावरही आम्ही उपाय शोधू, तसेच सर्व संघटनांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यासंदर्भात आम्ही भूमिका घेतली असल्याचं,’ अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितलं आहे. (Restrictions in Maharashtra)

पुढे अमित देशमुख म्हणाले, ‘रुग्णालयाच्या आवारात आयसोलेशन न करता इतर ठिकाणीही आयसोलेशनचा विचार करण्याचा आमचा विचार सुरू आहे.
रुग्णसेवेत हलगर्जीपणा होणार नाही, याचीही आम्ही काळजी घेत आहोत.
तर, आयसीएमआरबाबतही माहिती घेण्यात आली असून दुसऱ्या लाटेत ज्या सूचना होत्या, त्या सूचना या लाटेतही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना बाबतची माहिती मंत्री महोदय यावेळी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :-  Restrictions in Maharashtra | information given by minister amit deshmukh about lockdown in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर