PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) स्थायी समितीने (PMC Standing Committee) एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर (Property Tax) थकबाकीदारांसाठी अभय योजना (PMC Abhay Yojana) राबवण्यास मान्यता दिली होती. अभय योजनेंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक यांना यामध्ये सवलत मिळणार होती. अभय योजना (PMC Abhay Yojana) 20 डिसेंबर ते 26 जानेवारी या कालावधीसाठी राबवण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीच अंमलबजावणी न करता प्रशासनाने कमर्शियल मिळकतीवर (Commercial Property) कारवाई सुरु केली. दरम्यान, नगरसेवक (Corporator) आणि नागरिकांची मागणी पाहता महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी अभय योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी (Residential Property) असणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी ‘अभय योजना’

महापालिकेची मिळकत कराची वसुली आणि पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी ही योजना राबवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. अभय योजने (PMC Abhay Yojana) अंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. मात्र, प्रशासनाने यावर अंमलबजावणी करण्याचे सोडून आयुक्तांच्या आदेशानुसार कमर्शियल मिळकतीवर कारवाई सुरु केली होती. यातून महापालिकेला 55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परंतु शहरातील नागरिक अभय योजना लागू करण्याची वाट पाहत होते. मिळकत कर विभागाने देखील तसा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. मात्र त्यावर आयुक्तांनी सही केली नव्हती.

 

आयुक्तांची अभय योजनेला मान्यता, पण…

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी बुधवारी सायंकाळी मिळकत कर विभागासोबत (Income Tax Department) एक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचा कालावधी आता 26 जानेवारी पर्यंत असणार आहे. याच दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने यावर्षी देखील मिळकत करातून उत्पन्न मिळवण्याचा विक्रम केला आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळकत (PMC Property Tax) करातून मिळाले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title : PMC Abhay Yojna | Abhay Yojana for residential properties only! With the approval given by Municipal Commissioner Vikram Kumar, action will continue on commercial propertieses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी