‘काळजीवाहू’ मुख्यमंत्री राष्ट्रपती राजवटीनंतर बनले ‘Ex’ CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय सत्तास्थापनेच्या तिढ्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. 9 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपावला आणि राज्यपालांनी देखील फडणवीस यांचा राजीनामा स्विकारला होता.

परंतू राज्यातील या राजकीय नाट्या दरम्यान कोणीच सत्तास्थापनेस तयार नसल्याने अखेर राज्यपालांनी फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा स्विकारुन फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारावी अशी विनंती केली होती. त्यानंतर 10 तारखेपासून देवेंद्र फडणवीस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संभाळत होते. आज अखेर राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे पाहून राज्यपाल यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली.

या राष्ट्रपती राजवटीनंतर काळजीवाहू सरकार म्हणून काम करणार मुख्यमंत्री आज काळजीवाहू मुख्यमंत्रिपदावरुन मुक्त झाले आहेत. यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. परंतू राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कधी सुटणार यावर मात्र अजूनही संभ्रम आहे.

Visit : Policenama.com