Carrot Health Benefits | थंडीच्या हंगामात ‘या’ वेळी करा सुपर फूड गाजरचे सेवन, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Carrot Health Benefits | थंडीच्या मोसमात लोकांच्या घरी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात गाजराचा हलवा तर बहुतेक लोकांच्या घरात बनवला जातो, पण हे खाण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आरोग्य तज्ञ सांगतात की गाजर ही एक अशी भाजी आहे, जी पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण आहे. गाजर तुम्ही सॅलड, ज्यूस, लोणचे, केक, हलवा इ. च्या स्वरूपात खाऊ शकता. (Carrot Health Benefits)

 

काय आहे गाजर
myupchar नुसार, गाजराचे वैज्ञानिक नाव डॉकस कॅरोटा आहे. ही मूळतः युरोप आणि नैऋत्य आशियामध्ये पिकणारी भाजी आहे. पण आता हे पिक जगभर घेतले जात आहे. भारतात ते अनेक नावांनी ओळखले जाते.

 

गाजरातील पोषकतत्त्वे
गाजर पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, आयर्न, कॉपर आणि मँगनीज सारखे अनेक घटक आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. (Carrot Health Benefits)

गाजर खाण्याने शरीराला होणारे फायदे
नियमितपणे गाजर खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. यामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि ल्युटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात.

गाजराच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. गाजराच्या सेवनाने चयापचय क्रिया सुधारते, तसेच वजन सहजतेने कमी होण्यास मदत होते.

याशिवाय गाजराचे नियमित सेवन केल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते.

गाजराच्या सेवनाने तुमची इम्युनिटी वाढू शकते. यातील व्हिटॅमिन सी मुळे शरीरात अँटीबॉडीज बनवण्यास मदत होते, जे इम्युनिटीचे रक्षण करते. व्हिटॅमिन सी देखील संसर्ग टाळण्यास मदत करते.

गाजराच्या नियमित सेवनाने चेहर्‍यावरील मुरुम आणि काळे डागही दूर होतात. यासोबतच हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबतो आणि दातांची चमक वाढते.

 

गाजर कसे सेवन करावे
तुम्ही गाजर सामान्य पद्धतीनेही खाऊ शकता. याशिवाय त्याचा ज्यूसही पिऊ शकता.

 

गाजराचे सेवन कोणत्या वेळी करावे
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात की, जेवण करण्यापूर्वी गाजर खा, ते तुमच्या पचनाला मदत करेल. दुपारच्या जेवणात गाजराची कोशिंबीरही खाता येते, मात्र रात्री झोपण्यापूर्वी गाजर खाणे टाळावे.

 

Web Title :- Carrot Health Benefits | carrot health benefits know benefits of eating carrots daily in winter gajar khanyache fayde
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आजारी मालकाचा गैरफायदा घेत ड्रायव्हरने केली 51 लाखांची फसवणूक; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना

 

Railway Rules | रात्रीच्या प्रवासाबाबत रेल्वेने बनवले नवीन नियम, ‘हे’ कृत्य केल्यास होणार मोठी कारवाई; जाणून घ्या

 

Pune Crime | सराईत गुंडाचा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूहल्ला; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना