खून प्रकरणी दोन नगरसेवकांसह तिघांना अटक

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन

मंगळवेढयातील सचिन कलुबरमे खून प्रकरणात फरार असलेल्या दोन नगरसेवकांसह तिघांना पोलिसांनी गुजरातमधील वलसाड येथुन अटक केली आहे. दि. 25 एप्रिल रोजी फेसबुक वरील कमेंटवरून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवुन शहरातील मुरलीधर चौकात सचिन ज्ञानेश्‍वर कलुबरमे याचा धारदार हत्याराने वार करून बाबा नायकवाडीने खून केला होता.
नगरसेवक पांडुरंग नायकवाडी, नगरसेवक प्रशांत यादव आणि शिवराज बाळासाहेब ननवरे (रा. क्रांती चौक, पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कलुबरमे खून प्रकरणात नगरसेवक पांडुरंग नायकवाडी, प्रशांत यादव आणि ननवरे यांची नावे संशयित म्हणून समोर आली होती. रविवारी मध्यरात्री अटक आरोपींना मंगळवेढयात आणण्यात आले असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संशयितांना अटक व्हावी म्हणून कलुबरमे कुटूंबियांनी दि. 1 मे रोजी पोलिस ठाण्यासमोर उपोषण देखील केले होते. याप्रकरणी पदीप पडवळे यांनी फिर्याद दिली होती. सचिनच्या खूनाचा कट रचण्यात सहभागी असल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.