Homeआरोग्यCause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि...

Cause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि तणावापासून मिळेल मुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cause of Anxiety | आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक तणावातून जात असतो. हा तणाव हळूहळू सुरू होतो आणि नंतर वाढू लागतो. भविष्यात तो नैराश्याचे कारण बनतो. घर, कुटुंब, ऑफिस किंवा कोणतीही वैयक्तिक समस्या, नैराश्याचे कारण असू शकते. परंतु काहीवेळा ती शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील होते (Cause of Anxiety). तणावाखाली राहणार्‍या व्यक्तीचे मानसिक आरोग्य लवकर बिघडते. कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे भीती, अस्वस्थता किंवा तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो, आणि आहारात कोणता बदल करून यापासून सुटका मिळवता येते, ते जाणून घेवूयात (Cause of Stress and Anxiety)…

 

1. आहारात व्हिटॅमिन B1 चा करा समावेश
व्हिटॅमिन B1 ला थायमिन असेही म्हणतात. त्याच्या अभावामुळे घाबरल्यासारखे वाटते. सोबतच डिप्रेशन, चिंता, चिडचिड आणि निद्रानाश यासारख्या अनेक मानसिक समस्या होतात. व्हिटॅमिन बी 1 चा वापर करून मेंदू ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करतो. त्याच्या कमतरतेमुळे थकवा आणि भूक देखील कमी होऊ शकते. आहारात व्हिटॅमिन बी1 चे प्रमाण वाढवून तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. (Cause of Anxiety)

 

2. व्हिटॅमिन डी करते स्नायूंचा विकास
व्हिटॅमिन डी हाडे आणि स्नायूंच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि त्यामुळे नैराश्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चिंता निर्माण होते. आहारात व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवल्यास तणाव, घाबरणे किंवा अस्वस्थता या समस्यांमध्ये आराम मिळतो.

3. व्हिटॅमिन बी मुळे चिडचिड होईल दूर
चिडचिड होत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता आहे हे समजून घ्या.
व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे मूड खराब होतो. व्हिटॅमिन बी चे प्रमाण वाढवून चिडचिडेपणाची समस्या कमी करता येते.
मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी6, बी12 आणि बी9 देखील आहारात समाविष्ट करू शकता.
यासोबतच अन्नामध्ये लोह, आयोडीन, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर प्रमाणात घेणे चांगले असते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cause of Anxiety | these vitamin deficiency causes anxiety and depression other health issue tips anxiety

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Workout | महिलांनो, असे करत असाल वर्कआऊट तर व्हा सावध; अन्यथा होऊ शकते दुप्पट नुकसान, जाणून घ्या कधी स्कीप करावी एक्सरसाईज

Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 48 वर्षाच्या नराधमाला अटक

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News