CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune | पुण्याच्या महसूल विभागातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळयात; बाणेर येथील बंगल्यात CBI ची 20 अधिकार्‍यांची टीम दाखल (Video)

नितीन पाटील

पुणे : CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune | पुण्यातील महसूल विभागातील (Divisional Commissioner Office Pune ) उच्च पदस्थ अधिकारी लाच प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) जाळ्यात सापडला आहे. दरम्यान, सीबीआयच्या टीमने अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड (Additional Commissioner Dr. Anil Ramod) यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल रामोड यांनी तक्रारदाराकडे महामार्गालगत असलेल्या जागेचा परतावा लवकर देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, सीबीआयकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयचं पथक पुण्यात दाखल झालं. शुक्रवारी दुपारी एसजीएस मॉलजवळ (SGS Mall Pune) कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

 

 

सध्या अनिल रामोड यांना सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलं असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, अनिल रामोड रहावयास असलेल्या बाणेर (Baner) येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटीतील बंगल्यात सीबीआयचं 20 जणांचे पथक दाखल झाले असून तेथे देखील मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, नेमक काय प्रकरण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 8 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी अनिल रामोड यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

 

Web Title :  CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune | Pune revenue department IAS officer in CBI net;
A team of 20 CBI officials entered the bungalow in Baner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा